नागपूर,
Tamarind Hall, Chitnavis Centre ज्येष्ठ संगीततज्ज्ञ स्वर्गीय श्री. आप्पासाहेब इंदुरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचें शिष्य, चिटणवीस सेंटर आणि मैफिल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता चिटनवीस सेंटर येथील टॅमरिंड हॉलमध्ये ही मैफल आयोजित करण्यात आली आहे..तरुण व बहुआयामी गायक आदित्य मोडक यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही मैफल स्वर्गीय इंदुरकर यांच्या स्मृतीस समर्पित आहे. मुंबईहून येणाऱ्या आदित्य मोडक यांच्या सादरीकरणातून संगीतप्रेमींना शास्त्रीय संगीताची आत्मस्पर्शी अनुभूती मिळणार आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे गायक असलेले आदित्य मोडक यांनी लहान वयातच संगीत शिक्षणास सुरुवात केली. त्यांनी गंधर्व महाविद्यालयातून ‘संगीत अलंकार’ व ‘विशारद’ पदव्या मिळवल्या असून चंद्रकांत पारकर, प्रदीप धोंड आणि डॉ. राम देशपांडे यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली आहे.Tamarind Hall, Chitnavis Centre तसेच २०२० मधील ‘द डिसायपल’ चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत.या मैफिलीत हार्मोनियमवर श्याम ओझा (नागपूर) आणि तबल्यावर श्रीराज ताम्हणकर (मुंबई) साथसंगत करणार आहेत.सर्व संगीतप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: योगिता चकोले,संपर्क मित्र