वाहतूक जनजागृतीसाठी हेल्मेट वाटप

27 Mar 2026 19:13:40
नागपूर,
Traffic Awareness Campaign वाहतूक जागरूकता अभियानांतर्गत संविधान चौक येथे मॅक्स केअर हॉस्पिटल, मॅक्स हेल्थ केअर आणि नागपूर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हेल्मेटचे वाटप करण्यात आले.शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी दुपारी आयोजित या उपक्रमात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना हेल्मेट देत त्यांना नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
 
helmet
 
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीसीपी वाहतूक लोहित मतानी उपस्थित होते.Traffic Awareness Campaign तसेच मॅक्स केअर हॉस्पिटल व मॅक्स हेल्थ केअरचे अधिकारी अनुराग नायक, हर्षल वंजेकर तसेच नागपूर रस्ते वाहतूक सुरक्षा विभागाचे कौस्तुभ आगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: अशोक माटे ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0