स्थानिकांच्या पाठिंबातूनच रंगभूमी समृद्ध होईल!

27 Mar 2026 21:09:23
भंडारा,
world-theatre-day : स्थानिक कलाकार, मग तो कुठल्याही ठिकाणचा का असोना, त्याच्या कलेची स्थानिकांनी कदर केली तर नक्कीच तेथील रंगभूमी समृद्ध होऊ शकते. कलावंत आपल्यात मातीत घडतो. त्यामुळे प्रत्येक कलावंताची माफक अपेक्षा, असेल अशी भावना जिल्ह्यातीलच नव्हे तर आज परराज्यात आपल्या कलेच्या जोरावर असर फाउंडेशची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांपैकी असलेला हरहुन्नरी कलाकार विक्रम फडके यांनी व्यक्त केली.
 
 
k
 
 
 
27 मार्च या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने असर फाउंडेशन चे बहुआयामी कलावंत विक्रम फडके यांच्याशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला. सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असा वारसा असलेल्या भंडारा जिल्ह्यात आज मात्र ही सांस्कृतिक चळवळ कुठेतरी संथ झाल्याचे दिसते. स्थानिक कलावंतांच्या कलेला खंबीर पाठिंबा मिळाल्यास नक्कीच हा कलाकार केवळ स्वतःचे नाही तर जिल्ह्याचे नाव देश पातळीवर अधोरेखित करू शकतो, एवढी क्षमता कलावंतांमध्ये असते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. असर फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यात नाटकांच्या माध्यमातून आपल्या कलेचे सादरीकरण करून परराज्यात कौतुकाची थाप मिळविणारे कलावंत मात्र स्थानिक पातळीवर आपल्याच लोकांच्या कौतुकाला मुकतात, याचा कुठेतरी विचार होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कलावंत हा असच असो की अन्य कुठल्याही चळवळीशी निगडित असो, प्रत्येकाच्या कलेची जोपासना त्यांच्याच लोकांनी करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली.
 
 
आमच्यासारख्या कलाकारांची कला केवळ शासनाच्या योजनांचा प्रचार प्रसार करण्यापूर्वी मर्यादित राहू नये. आज त्यातही कुठेतरी मर्यादा येत आहेत. डिजिटलतेकडे जाताना कलावंतांची कला दृष्टी आड जात आहे. अशावेळी शासन स्तरावरूनही कलाकारांची ही खंत जपली जावी एवढी अपेक्षा आहे.
 
 
आता आम्ही कलाकार म्हणून आपल्या कलेच्या जोरावर स्वतःला जगता येईल, एवढी धडपड करतो आहे. मात्र याला स्थानिकांचे पाठबळ, शासनाचे सहकार्य मिळाल्यास आमच्यातील कलावंत आणखी खुलत जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर चांगले नाट्यगृह असावे ही कायम मागणी आमची आहे. जिल्ह्याचे नाव या देशाला मिळू शकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या कलेची झालेली कदरच प्रेरणा देणारी असते. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने स्थानिक कलावंतांच्या पाठीशी उभे राहण्याचा जर संकल्प होत असेल, तर हीच खऱ्या अर्थाने जागतिक रंगभूमी दिनी आमच्यासारख्या कलावंतांना मिळालेली शिदोरी असेल असेही विक्रम फडके म्हणाले.
Powered By Sangraha 9.0