दुचाकीची ट्रकला धडक, तरुणाचा मृत्यू

28 Mar 2026 19:58:57
राष्ट्रीय महामार्गावरील घटना
 
हिंगणघाट, 
राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड समोर पुलावर दुचाकी ट्रकवर आदळल्याने शुक्रवार २७ रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान अपघात झाला. यात  accident दुचाकीस्वार तरुण अर्पण अमोल वानखेडे याचा मृत्यू झाला.
 
 
accddksdk
 
accident  मिळालेल्या माहितीनुसार, तीन युवक दुचाकीने महामार्गावरून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची पुढे चाललेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. यात दुचाकी चालक अर्पण वानखेडे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले इंदिरा गांधी वार्ड येथील दोन मित्र प्रियांश पोहणीकर आणि बसंतरसिंग टाक हे किरकोळ जखमी झाले.
Powered By Sangraha 9.0