सिलेंडरअभावी चुलीवरच पोषण आहार

28 Mar 2026 20:19:45
सेलू
lack of cylinders Selu तालुयातील महाबळा येथील इंदिरा हायस्कूलमध्ये पोषण आहार शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे चुलीचा वापर केला जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना वेळेवर व स्वच्छतेने आहार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
 
selu news 
lack of cylinders Selu  शासनाच्या पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत गरम व पौष्टिक जेवण देण्याचा उद्देश आहे. मात्र, सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे शाळेला चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी अधिक वेळ लागतो तसेच धूर आणि अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. शाळेतील पोषण आहार शिजवण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचार्‍यांना या परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही विद्यार्थ्यांना वेळेत जेवण देण्याचा प्रयत्न केला जातो. संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने गॅस सिलेंडरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0