नागपूर,
Ambazari Parikrama रामनवमीच्या मुहूर्तावर UCN आणि P D वॉकर यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावी अंबाझरी परिक्रमा आयोजित करण्यात आली. सकाळी ५:४५ वाजता P D वॉकर चे संचालक श्री प्रमोद डोंगरे यांनी सहभागी लोकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या, आणि सकाळी ६:०० वाजता परिक्रमेची सुरुवात झाली. या परिक्रमेतील एकूण ३२० लोकांनी उत्साहाने भाग घेतला.
परिक्रमेतील वयाची श्रेणी १० वर्षांपासून ते ८२ वर्षांपर्यंत होती. ९९ वर्षीय डोंगरे यांनीही उत्साहाने 5 किलोमीटर अंतर पूर्ण केले. तर ८२ वर्षीय कुंदा मुळे यांनी ही परिक्रमा तिसऱ्यांदा पूर्ण केली. Ambazari Parikrama UCN आणि P D वॉकर तर्फे सर्व सहभागी लोकांना कॅप देण्यात आले. मध्य अंतरावर सर्वांना फ्रूटी आणि चॉकलेट देऊन त्यांचा जोश वाढविला गेला. बघता बघता सर्वांनी अवघ्या 3 तासात ११ किलोमीटरची परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली. परिक्रमेच्या नंतर उत्तम नाश्त्याची व्यवस्था केली होती आणि सर्व सहभागी लोकांना सर्टिफिकेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य: मीनाक्षी देशपांडे, संपर्क मित्र