बुलढाणा,
Bear in Malkapur, city शहरातील मलकापूर रोड परिसरातील म्हाडा कॉलनीत एल-बिल्डिंगच्या मागील बाजूस शुक्रवारी २७ मार्च रोजी रात्री तीन अस्वलांचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे चित्रीकरण स्थानिक नागरिकांनी मोबाईल कॅमेर्यात कैद केले असून हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उशिरा रात्रीच्या सुमारास एल-बिल्डिंगच्या मागील मोकळ्या जागेत तीन अस्वले फिरताना दिसली. काही रहिवाशांना बाहेर हालचाल जाणवल्यानंतर त्यांनी खिडकीतून पाहिले असता ही अस्वले परिसरात वावरताना आढळली. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखत या घटनेचे चित्रीकरण केले. या अनपेक्षित म्हाडा घटनेमुळे कॉलनीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला असून सतर्कता वाढवण्यात आली आहे.
Bear in Malkapur, city स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली असून संबंधित यंत्रणा सतर्क झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अन्नाच्या शोधात ही अस्वले जवळच्या जंगल भागातून नागरी वसाहतीकडे आली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा परिस्थितीत घाबरून न जाता सावधगिरी बाळ-गावी रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये आणि वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच अशा घटना आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. या घटनेमुळे नागरी भागात वन्यप्राण्यांची वाढती घुसखोरी हा पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरला असून प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.