अजिंठा लेणी पाहणाऱ्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

28 Mar 2026 14:39:34

Bee attack on tourists
 
 
छ.संभाजीनगर,
Bee attack on tourists जगप्रसिद्ध अजिंठा लेणी क्रमांक ४ परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे अचानक मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढल्यावर मधमाश्यांची हालचाल आणि हल्ल्याचे प्रमाण वाढते. अशावेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्या भागात काही काळ जाण्यावर मनाई केली जाते. मधमाश्या शांत झाल्यानंतरच पर्यटकांना पुन्हा लेणी पाहण्यासाठी परवानगी दिली जाते, असे पुरातत्त्व विभागाने सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0