मुंबई
Dhurandhar 2 अभिनेता रणवीर सिंहचा धुरंधर 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत असून, देशासह जगभरात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांत या चित्रपटाने कमाईचे विक्रम मोडले आहे
चित्रपटाने नवव्या दिवशी तब्बल ४१.५५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. आतापर्यंत भारतातील एकूण नेट कमाई ७१५.७२ कोटी रुपयांवर पोहोचली असून, ग्रॉस कलेक्शन ८५४.९९ कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. परदेशातही या चित्रपटाने दमदार कामगिरी करत २७४ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. त्यामुळे चित्रपटाचे जागतिक एकूण ग्रॉस कलेक्शन ११२८.९९ कोटी रुपयांवर पोहोचले असून, तो ब्लॉकबस्टर ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बॉलिवूडमधील Dhurandhar 2 नामांकित दिग्दर्शक-निर्माते करण जौहर यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला असून, त्यांनी सोशल मीडियावर त्याचे मनापासून कौतुक केले आहे. त्यांनी या चित्रपटाला रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. तसेच दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनालाही त्यांनी विशेष दाद दिली आहे.