टिपेश्वरमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा यांची थरारक निसर्गसफर

28 Mar 2026 20:15:06
पांढरकवडा, 
यवतमाळ जिल्ह्यातील हिरवाईने नटलेल्या Dia Mirza in Tipeshwar टिपेश्वर नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री व पर्यावरणप्रेमी दिया मिर्झा यांनी २७ व २८ मार्च रोजी दोन दिवसांची अविस्मरणीय निसर्गभेट दिली. त्यांच्यासोबत पती वैभव रेखी हेही उपस्थित होते. या सफरीदरम्यान दिया मिर्झा यांनी जंगलातील नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध जैवविविधता आणि वन्यजीवांचा रोमांचक अनुभव जवळून घेतला. सकाळच्या सफारीत ‘४-मार्क’ मादी वाघीण तर तलाव परिसरात या वाघिणीचे दुर्मिळ दर्शन झाल्याने त्या अक्षरशः भारावून गेल्या. या क्षणांना त्यांनी आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असे संबोधले.
 
 
Dia Mirza
 
वनसंवर्धनाबाबत जागरूक असलेल्या Dia Mirza in Tipeshwar मिर्झा यांनी टिपेश्वरमधील वाघ संवर्धनासाठी वनविभाग करत असलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. लॅन्टाना निर्मूलन आणि गवताळ क्षेत्र विकास यांसार‘या उपक‘मांमुळे वन्यजीवांच्या अधिवासात झालेली सुधारणा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. वन विश्रामगृहात पांढरकवडा विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) उत्तम फड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जंगल व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपक‘मांची माहिती देण्यात आली. या प्रसंगी पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) प्रशांत सोनुले, वनपाल सोनटक्के, वनरक्षक पोटे, कार्यालयीन कर्मचारी साकीब शेख तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यपद्धतीने प्रभावित होत दिया मिर्झा यांनी टिपेश्वरचे जंगल सुंदर, समृद्ध आणि उत्तम व्यवस्थापित असल्याचे उद्गार काढले. त्याची ही भेट केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणारी ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0