फ्लोरिडा
Golf star Tiger Woods arrested गोल्फविश्वातील दिग्गज खेळाडू टायगर वूड्स पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. १५ वेळा मोठ्या स्पर्धांचा विजेता असलेल्या या ५० वर्षीय खेळाडूला अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात पोलिसांनी अटक केली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि तपासात सहकार्य न करणे असे गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. ज्युपिटर आयलंड परिसरात त्याच्या घराजवळ त्याची गाडी उलटल्याची घटना घडली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याला मार्टिन काउंटीच्या कारागृहात ठेवण्यात आले असून स्थानिक कायद्यानुसार काही काळ कोठडीत ठेवणे बंधनकारक आहे.

या प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे अटकेनंतर करण्यात आलेल्या श्वास चाचणीत त्याच्या शरीरात मद्याचे प्रमाण आढळले नाही. मात्र, त्याने मूत्र तपासणी करण्यास नकार दिला. पोलिसांच्या मते, तो कोणत्यातरी औषधांच्या प्रभावाखाली असल्याचे जाणवत होते, तरीही त्याच्या वाहनातून कोणतीही संशयास्पद वस्तू मिळाली नाही. यापूर्वीही २०१७ मध्ये अशाच प्रकारच्या आरोपांमध्ये त्याला अटक झाली होती आणि त्यावेळी त्याला शिक्षेसोबत समाजसेवा करावी लागली होती.