उत्तर नागपूरमध्ये भव्य शोभायात्रा

28 Mar 2026 10:13:09
नागपूर,
North Nagpur बेलिशॉप–मोतीबाग रेल्वे कॉलनी, कामठी रोड येथील प्राचीन श्री शिव मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यंदा या शोभायात्रेचे २४ वे वर्ष साजरे करण्यात आले. रामनवमीच्या निमित्ताने सुमारे ३२० वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिरातील शोभायात्रेत पद्मश्री डॉ. विलास डांगरे, विरेंद्र झा, पी. सत्याराव, जुगलकिशोर शाहू, शरद शर्मा, उमेश चौकसे, प्रकाशराव (गुंडू) आणि पी. विजयकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
 
North Nagpur
 
शोभायात्रेपूर्वी सर्व मान्यवरांनी मंदिरातील राम-जानकी यांच्या प्रतिमांचे पूजन केले. त्यानंतर अष्टधातूच्या दीड फूट उंच अभिषेक मूर्तींना फुग्यांनी सजवलेल्या रथावर विराजमान करून नगरभ्रमणासाठी सज्ज करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे रामनामाचे दुपट्टे देऊन स्वागत करण्यात आले. North Nagpur रामदरबाराच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर मान्यवरांनी आयोजनाचे कौतुक केले. धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक संदेश देणारे उपक्रमही राबवले जात असल्याचे डॉ. डांगरे यांनी नमूद केले. ते स्वतः अनेक वर्षांपासून या आयोजनाशी जोडलेले आहेत. शोभायात्रेत सजवलेला रामरथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. युवकांनी हातात रामनामाच्या ध्वजा घेत उत्साहात सहभाग नोंदवला. राम-जानकी, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सजीव झांक्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच लहान मुलांनी हनुमानाच्या वेशभूषेत सहभागी होत वातावरण भक्तिमय केले. संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
 
शोभायात्रेचा मार्ग रंगोळ्यांनी सजवण्यात आला होता. विविध संस्थांनी मार्गात शरबत, आईस्क्रीम, ताक, चणे आणि कॉफीचे वाटप करत स्वागत केले. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. यापूर्वी सकाळी १०:३० वाजता सुंदरकांडाचे पठण झाले, तर दुपारी १२:०० वाजता रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी बधाईगीत गाऊन आनंद व्यक्त केला आणि त्यानंतर रामजींचा अभिषेक करण्यात आला. North Nagpur आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवयुवक मंडळातर्फे मार्गात प्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. मोतीबाग येथे गणपती सेना उत्सव मंडळातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. नाग मंदिर समितीसह विविध ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत झाले.
 
शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय कुमार, सौरभ धुरिया, महंत पोतभरे, पवन तेम्बुर्णे, गणेश श्रीवास्तव, सौरभ गुंटलवार, रुद्र पोतभरे, सोनू धुरिया, North Nagpur शुभम धुरिया, सागर पिल्ले, सोनू सरेथा, टिंकू श्रीवास, सुभाष डबली, गणेश गोंडाने, विजय चंदनखेड़े, यशवंत नाम्मी, अमन शेंडे, उद्देश चंद्रशी, राकेश यादव आणि श्रवण शर्मा यांच्यासह युवक व भाविकांनी परिश्रम घेतले.
घट विसर्जन व राम-जानकी विवाह आज
शनिवार २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता माताजींच्या मुख्य घटाचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यानंतर मनोकामना अखंड ज्योतीच्या घटाचे विसर्जन होईल. North Nagpur सायंकाळी ६:३० वाजता नाग मंदिरातून रामजींची बारात निघेल. सायंकाळी ७:३० वाजता पट्टाभिषेक, तर रात्री ८:०० वाजता राम-जानकी विवाह सोहळा पार पडेल. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0