शेगाव
Meditation Camp Shegaon श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन द्वारा आयोजित आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालय द्वारा समर्थित ’हिमालयीन समर्पण ध्यानयोगाचे शिबीर’ श्री गजानन महाराजांच्या सान्निध्याने पावन झालेल्या शेगावमध्ये येत्या ३१ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत संध्याकाळी ६ वाजता स्व. गजानन दादा पाटील मार्केट यार्ड (कॉटन मार्केट) मैदान येथे सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या प्रत्यक्ष सान्निध्यात आयोजित करण्यात आले आहे. हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिर हे निःशुल्क आहे.
Meditation Camp Shegaon श्री शिवकृपानंद स्वामीजी एक आत्मसाक्षात्कारी ऋषी आहेत आणि हिमालयीन समर्पण ध्यानयोगाचे प्रणेते आहेत. सद्गुरु श्री गजानन महाराजांचे शेगाव येथील समाधी स्थान हे स्वामीजींचे प्रेरणास्रोत आहे. श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि प्रेरणेने स्वामीजी हिमालयात गेले व तिथून स्वामीजींना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.
Meditation Camp Shegaon सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी यांनी हिमालयात १६ वर्षे ध्यानसाधना करून ८०० वर्षांची प्राचीन समर्पण ध्यानयोग परंपरा समाजात रुजवली आहे. आज या ध्यानयोगाचा प्रसार ७२ हून अधिक देशांमध्ये झाला आहे. त्यांच्या जागतिक कार्याची दखल घेत, त्यांची वर्ल्ड मेडिटेशन फाऊंडेशनच्या जागतिक मेडिटेशन एक्स्पर्ट कमिटीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
Meditation Camp Shegaon शेगाव येथे आयोजित हिमालयीन ध्यान शिबिराला ७२ देशातून हजारो साधक येणार असून याचा विदर्भातील लोकांनी देखील आपले आभा मंडळ विकसित करण्याकरीता या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन चे मुख्य प्रचारक आशिष कलावार यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यावेळी सचिन भट्टभट्ट (कार्यालयीन व्यवस्थापन व देश विदेश समन्वयक.) सह अन्य मान्यवर हि उपस्थित होते
Meditation Camp Shegaon शेगावमध्ये होणाऱ्या या विशेष शिबिरात श्री शिवकृपानंद स्वामीजी स्वत: अतिशय सहज, समजण्यास सोप्या प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करतील आणि सर्वांना ध्यानाच्या प्रत्यक्ष अनुभूतीकडे नेतील. सतगुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त साधकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून ज्ञानार्जन करीत आत्मिक आनंदाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.