सर्वे भवन्तु सुखीन: हे हिंदू धर्माची धारणा : घीसुलाल काबरा

28 Mar 2026 18:14:52
कडोली,
Hindu Smmelan सर्व सुखी राहावे, सर्वांचे भले व्हावे, हा हिंदू धर्माचा सारा असून हे सत्य आता विश्‍वांनी मान्य केले आहे. पण सत्य असून चालणार नाही. सत्याबरोबर शक्तीही असावी लागते. वीस वर्षांपूर्वी काही बाबतीत आपण दुर्बल होतो. आता भारत स्वयंपूर्ण झाला आहे. तरीही भारत सत्य, अहिंसेचा मार्ग स्वीकारत असल्याने जगाने भारताची सर्व सुखी भवन्तु: ही शिकवण मान्य केली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घीसुलाल काबरा यांनी केले.
 
 
hindu
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वैरागड येथे सकल हिंदू संमेलन 25 मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डुकरू मुंगीकोल्हे होते. याप्रसंगी धार्मिक कार्यात काम करणार्‍या मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये स्व. विनोद फुलबांधे यांच्या पत्नी वैशाली फुलबांधे, शिवराम बोदेले, फुकट दूमाने, विश्‍वनाथ मडावी पाटणवाडा, गणपत गेडाम मोहझरी यांचा समावेश होता.
 
 
Hindu Smmelan कार्यक्रमाला उपसरपंच भास्कर बोडणे, मनोहर तीतीरमारे, विजय गुरुनूले, महादेव दूमाने, विश्‍वनाथ ढेगरे, सुभाष हर्षे, बालाजी पोपडी, मधुकर हर्ष, डॉ. पटणे, नेताजी नेवारे, अजय नवहाते, राजकुमार नंदरधने, हिरामण मुंगीकोल्हे, दिवाकर खरवडे, सुनील उपरे, प्रतिभा बनकर, पांडुरंग बावनकर, सत्यदास, जितेंद्र खरवडे, रमेश पगाडे, प्रकाश डुंबरे, कोविद खरवडे, दत्तू हर्षे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. संदीप ढेगरे यांनी केले. यशस्वीतेसाठी भाऊराव नेवारे, दिलीप गोटेफोडे, मनोज उपरे, गोपाल दुमाने, एकनाथ गोटेफोडे यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0