पुसद,
Illegal storage: Commercial cylinder seized येथील इंद्रप्रस्थनगरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडरची साठवणूक करून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शाखेच्या पथकासह तहसील संयुक्त कारवाई करत धाड टाकली. या धाडीत २१ सिलेंडर्स जप्त केले आहेत. ही कारवाई शुक‘वार, २७ मार्च रोजी केली होती. सावरलाल मथुरालाल जाट असे कारवाई झालेल्या इसमाचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या माहितीनुसार सावरलाल जाट याच्या घरी अवैधरित्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठवून असल्याच्या माहितीच्या आधारे छापा टाकून कारवाई आहे. कारवाईत इण्डेन, एचपी अशा वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण १९ व्यावसायिक आणि ५ किलोचे २ असे एकूण २१ व्यावसायिक गॅस सिलेंडर सापडले. त्याबाबत सावरलालचा भाऊ सुरेंद्र मथुलाल जाट याला या सिलेंडरबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे आढळून न आल्याने ६० हजार रुपये किमतीचे हे जप्त केले.
Illegal storage: Commercial cylinder seized ही कारवाई तहसीलदार रेखा वाणी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धीरज बांडे, उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष बोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे, उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव, निरीक्षण अधिकारी अमोल महाजन, पुरवठा निरीक्षक पवार, संगीता तरे, छाया जामकर, अमित अजमेरे, छाया लोंढे, सतीश आळणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.