वर्धा
Kayaking-canoeing जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच साहसी जलक्रीडा स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने व युवा एकता क्रीडा मंडळ आणि वर्धा जिल्हा कयाकिंग-रोविंग सेलिंग असोसिएशनच्या संयुत वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय स्पर्धा २६ व २७ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.
Kayaking-canoeing सेलू तालुयातील निसर्गरम्य पंचधारा रिदोरा धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात २६ आणि २७ मार्च रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील युवा-युवतींकरिता एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. अशा प्रकारची जलक्रीडा स्पर्धा जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आल्याने जिल्ह्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता.
Kayaking-canoeing या स्पर्धेत वर्धा, सेलू, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव आणि देवळी अशा विविध तालुयातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. १०० मुले आणि मुलींनी या साहसी खेळात आपले नशीब आजमावले. रिदोरा गावातील स्थानिक ग्रामस्थांसाठी आणि लहान मुलांसाठी ही स्पर्धा आकर्षणाचे केंद्र ठरली होती. या अटीतटीच्या सामन्यांमध्ये वर्धा संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
Kayaking-canoeing स्पर्धेत वर्धा संघाने विजेतेपद पटकावत ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य अशी ९ पदकं पटकावली. या स्पर्धेमुळे वर्धा जिल्ह्यात कयाकिंग आणि कॅनोइंग सारख्या ऑलिम्पिक खेळांना एक नवीन ओळख मिळाली आहे. स्थानिक जलस्त्रोतांचा योग्य वापर केल्यास, भविष्यात वर्धा जिल्ह्यातून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे उत्कृष्ट जलक्रीडापटू घडू शकतात, असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यत केला. ग्रामीण भागातील मुलांच्या अंगात असलेल्या कौशल्याला अशा स्पर्धांमुळे नकीच वाव मिळणार आहे. या यशाबद्दल विजयी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.