शेतकर्यांचे मोठे नुकसान
मालेगाव,
Kolhi Dam: Cable theft तालुयातील पांगरी नवघरे येथील कोल्ही धरण परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतकर्यांच्या मोटार पंपाला जोडलेल्या केबलची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून, शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
याबाबत उमेश किसनराव घोडे वय ३४, रा. पांगरी नवघरे यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, त्यांच्या गट क्रमांक १२३ मधील शेतात हळदीचे पीक असून ते कोल्ही धरणावरून मोटार पंपाद्वारे सिंचन करतात. २७ मार्च रोजी दुपारी शेताला पाणी देऊन घरी आल्यानंतर २८ मार्च रोजी सकाळी केबल चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शेतकरी व पोलीस पाटील घटनास्थळी गेले असता तपासणीदरम्यान केबल चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत उमेश घोडे यांच्यासह पंढरी नवघरे, दिलीप नवघरे, संदिप नवघरे, रामेश्वर नवघरे, केशव नवघरे, प्रल्हाद नवघरे, गोपाल नवघरे, कैलास शिंदे, ज्ञानबा नवघरे, गजानन नवघरे, अमोल नवघरे आदी शेतकर्यांच्या केबलची चोरी झाली आहे.
Kolhi Dam: Cable theft सदर चोरी २७ मार्च दुपारी २ वाजेपासून २८ मार्च सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरणी मालेगांव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून, पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप रहाटे करीत आहेत.