महिलांमध्ये दहशत पसरवणार्‍या ‘त्या’ मनोरुग्णाला घेतले ताब्यात

28 Mar 2026 18:08:36
आलापल्ली,
Mentally ill person in police custody अहेरी नगर पंचायत परिसरात गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडणार्‍या आणि महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या ‘त्या’ विकृत मनोरुग्णाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक नागरिक व महिलांनी केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली असून, आता शहरातील जनतेने सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा मनोरुग्ण रात्रीच्या वेळी लोकांच्या घरात शिरून तोडफोड करणे, फळझाडांचे नुकसान करणे आणि महिलांसमोर अश्‍लील चाळे करणे अशा गंभीर कृत्यांमध्ये गुंतला होता. यामुळे अहेरीतील महिलावर्गात प्रचंड भीती पसरली होती. या संदर्भात नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार देऊन या व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
 
 
arest
 
Mentally ill person in police custody तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने या मनोरुग्णाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. सध्या या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून, त्याला पुढील उपचारासाठी योग्य त्या वैद्यकीय केंद्रात किंवा मनोरुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया पोलिस प्रशासनाकडून केली जात आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अहेरीतील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. विशेषतः महिलांनी आता सुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याने त्याला उपचारांची गरज आहे. मात्र त्याच्याकडून कोणालाही इजा होऊ नये यासाठी आम्ही त्याला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
हर्षल ऐकरे, पोलिस निरीक्षक, अहेरी.

मनोरुग्ण हा रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान घरावर चढून आंब्याच्या झाडाला लागलेले आंबे तोडून फेकले आणि विटा फेकल्या. तसेच एका जणाच्या घरावर मलमूत्रांनी घाण केली. महिलांना बघून तो विकृती कृत्य करीत होता. मात्र पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई केल्यामुळे आम्हा महिलांना मोकळा श्‍वास घेता येईल. या कारवाईमुळे पोलिस विभागाचे आभार.
पल्लवी सिलमवार, महिला नागरिक, अहेरी.
Powered By Sangraha 9.0