अस्वलीतल्या मातृत्वाने वेधले लक्ष

28 Mar 2026 21:51:24
शावकांना पाठीवर घेऊन भ्रमंती
प्रवास पाणी किंवा सुरक्षित स्थानासाठी
 
अमरावती, 
Motherhood in bears माता कोणत्याही रूपातली असो तिचे आपल्या पिल्लांवर जिवापाड प्रेम असते. त्यांना थोडासाही त्रास ती होऊ देत नाही. त्यांच्या गरजा ओळखून पुर्ततेसाठी तिची धडपड असते. अशीच एक घटना मेळघाटातल्या जंगलात कॅमेर्‍यात कैद झाली. अस्वल आपल्या पिल्लांना पाठीवर घेऊन भ्रमंती करताना दिसले. तिचा हा उन्हातला दोन किमीचा प्रवास पाण्याच्या शोधासाठी किंवा शावकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी केला असावा, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला.
 
 
bear 2
 
Motherhood in bears  मेळघाटातील हरिसाल बोरी मार्गावर सेमाड आणि बुरी दरम्यानचे दुर्मिळ दृश्य जंगल सफारी मार्गावर पाहायला मिळाले. सामाजिक कार्यकर्ते रोहीत पाल यांनी अस्वलीची ही भ्रमंती आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केली. मादी अस्वलाने आपल्या लहान शावकांना पाठीवर बसवून प्रवास केल्याचे हे दृश्य मायेचा ओलावा दर्शविणारे ठरले आहे. सुमारे २ किलोमीटरपर्यंत ती शावकांना घेऊन जाताना दिसली. या भ्रमंतीची दोन कारणे प्रामुख्याने असू शकतात ती म्हणजे, पोटच्या शावकांना सुरक्षित ठिकाणी नेणे किंवा स्वत: व त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी शोधणे! दोन पैकी कारण कोणतेही असो पण, अस्वलीची मातृत्वाची ममता त्यातून पाहायला मिळाली.
Powered By Sangraha 9.0