..अखेर अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उघड

28 Mar 2026 19:25:18
कळंब हद्दीतील तासलोट जंगलातील अज्ञात मृतदेह
आरोपीस अटक

यवतमाळ, 
Murder case of an unknown woman कळंब पोलिस ठाणे हद्दीतील तासलोट जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात त्याचे रहस्य उलगडले यवतमाळ पोलिसांनी आरोपीसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी शनिवार, २८ मार्च रोजी पत्रपरिषदेत दिली. राणी किशोर वानखेडे (वय २६ चापडोह, ता. जि. यवतमाळ) असे मृत महिलेचे नाव असून सतीश रमेश कश्यप (वय २०, चापडोह) असे आरोपीचे नाव आहे. तासलोटच्या जंगलात १५ मार्च रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
 
 
murder
 
आरोपीने त्या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा चेहरा जाळला होता. मृतदेह बर्‍याच कालावधीपासून जंगलात पडून राहिल्याने तो कुजलेल्या अवस्थेत तसेच वन्य प्राण्यांनी खाल्लेला असल्यामुळे मृत महिलेची ओळख पटवणे कठीण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या नेतृत्वात ६ उपविभागीय स्तरावर १ व पोलिस ठाणे स्तरावर १ अशी एकूण ८ विशेष पथके स्थापन केल्याचे कुमार चिंता यांनी सांगितले.
 
 
Murder case of an unknown woman यासंबंधी ४० हजार मोबाईल क‘मांक प्राप्त करून त्यातील संशयित क‘मांक तपासण्यात आले होते. १ मार्चपासून जिल्ह्यातील ८४ तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांसह तेलंगण राज्यातील ८७ महिलांच्या हरविल्याच्या तक‘ारी तपासण्यात आल्या. घटनास्थळ ४० किमी क्षेत्रातील प्रत्येक गावात तपास करण्यात आल्याचेही कुमार चिंता यांनी सांगितले. या प्रकरणी तपासण्यात आलेल्या १९६ सीसीटीव्हींपैकी जोडमोहा येथील सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक जोडपे दुचाकीने तासलोट फाट्याकडे जाताना आढळून आले. मात्र काही वेळाने परत येताना त्याच वाहनावर एकटाच पुरुष येताना दिसून आल्याने तपासाची दिशा तिकडे वळवण्यात आली. त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही तपासण्यात येऊन दुचाकी क‘मांक एमएच२९ सीके९७५४ चा वाहनधारक सतीश कश्यपचे मोबाईल क‘मांक तपासण्यात आले. त्याची विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
 
 
आरोपी सतीशने १० मार्च रोजी राणी वानखेडे हिला पुणे येथून यवतमाळला बोलावले होते. ११ मार्च रोजी ते दोघे विविध ठिकाणी फिरून संध्याकाळी तासलोट जंगल गेले. तेथे प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून सतीशने पूर्वनियोजित हेतुने राणीचा दुपट्याने गळा आवळून व चाकूने पोट व गळ्यावर वार करून तिचा खून केला. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह दगडाने विद्रूप करून आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच राणी वानखडेचे सर्व साहित्य जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या कामी सतीश कश्यप एका अल्पवयीन मुलाने मदत केल्याचे त्याने सांगितले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात व उपअधीक्षक दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, कळंब ठाणेदार राजेश राठोड, सहपोलिस निरीक्षक मनीष गावंडे, पवन राठोड, उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, धनराज हाके, शरद लोहकरे व पथकाने पार पाडली.
Powered By Sangraha 9.0