नयना गुंडे अमरावतीच्या नव्या विभागीय आयुक्त

28 Mar 2026 14:51:46
अमरावती,
nayana gunde अमरावती विभागाच्या आयुक्त श्वेता सिंघल यांची मुंबई येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नयना गुंडे यांची नवीन विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 

नयना गुंडे  
 
 
राज्य शासनाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला असून, प्रशासनातील व्यापक फेरबदलाचा हा एक भाग असल्याचे समजते. श्वेता सिंघल यांनी आपल्या कार्यकाळात विविध विकासकामांना गती देत प्रशासनावर ठसा उमटवला होता. दरम्यान, नयना गुंडे या कडक शिस्तीच्या आणि परिणामकारक निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे अमरावती विभागातील प्रलंबित कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे.nayana gunde यापूर्वी त्या पुणे येथे महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांची बदली आता मुंबई येथे 'महामुंबई मेट्रो कॉर्पोरेशन'च्या कार्यकारी संचालकपदी करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0