उजव्या हाताच्या बोटाऐवजी डॉक्टरांनी कापlले डाव्या हाताचे बोट

28 Mar 2026 14:47:29
पंढरपूर
child finger amputation विठ्ठलाच्या नगरीतून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एका सहा वर्षाच्या बालकाच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा गंभीर प्रकार घडला. बालकाच्या उजव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते, मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळे डाव्या हाताचा निरोगी बोट कापला
 

Pandharpur medical negligence, child finger amputation 
शाहू सुनील दंदाडे (वय ६ वर्ष) या बालकाला जन्मतःच दोन्ही हातांना सहा-सहा बोटे होती. काही दिवसांपासून शाहूच्या उजव्या हाताच्या सहाव्या बोटामध्ये वेदना होत होत्या. त्यानुसार पालकांनी त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून उजव्या हाताच्या वाढीव बोटावर शस्त्रक्रिया करून काढण्याचा सल्ला दिला.शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन झाले. पालकांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रिया गृहात नेण्यापूर्वीच उजव्या हातावरच उपचार करायचे ठरले होते. परंतु शस्त्रक्रियेनंतर जेव्हा बालक बाहेर आणला गेला, तेव्हा पालकांना धक्काच बसला. डॉक्टरांनी ज्या बोटाचा त्रास होत होता, त्या उजव्या हाताला टाळून डाव्या हाताचा निरोगी बोट कापला होता.
दंदाडे कुटुंबीयांनी संताप child finger amputation व्यक्त करत म्हटले, “माझ्या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटाला त्रास होता, पण डॉक्टरांनी विचार न करता डाव्या हाताचे बोट कापले. हा आमच्या मुलाच्या भविष्याशी खेळ आहे.” या घटनेमुळे पंढरपूरमध्ये मोठा खळबळ उडाली असून नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे सांगितले. त्यांनी आश्वासन दिले की, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
Powered By Sangraha 9.0