सावधान! टंचाई होणार पाण्याचा जपून वापर करा

28 Mar 2026 11:34:17
पुणे,
Pune water shortage हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागाने अंमलबजावणी सुरू केली असून, यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
 

Pune water shortage alert 
कसे राहणार नियोजन?
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या Pune water shortage  खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी फाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातील पाण्याचे वाटप करताना ठराविक प्राधान्यक्रम पाळला जात आहे. यामध्ये सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असून, त्यानंतर औद्योगिक वापर, शेतीसाठी पाणी आणि नदीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. यामुळे मर्यादित साठ्याचा योग्य वापर होऊन संभाव्य टंचाई टाळण्याचा प्रयत्न आहे.पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांवरील अवलंबित्व लक्षात घेता, पावसाचे प्रमाण घटल्यास धरणसाठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत धरणातील साठा अधिक काळ टिकवून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0