पुलगावात साजरा झाला राम जन्मोत्सव

28 Mar 2026 19:50:42
दिवसभर चालला रामनामाचा जयघोष
 
पुलगाव, 
Ram Janmabhoomi in Pulgaon येथील वर्धा नदीच्या काठावर वसलेले प्राचीन भगवान श्रीराम मंदिरात रामाचा जन्मोत्सव साजरा झाला. शहरात दिवसभर श्रीरामाचा जयघोष सुरू होता. सकाळी ६ वाजता स्टेशन चौकापासून प्रभात फेरी काढण्यात आली. बस स्टँड चौक, आठवाडी बाजार चौक, भगतसिंह चौक, गांधी चौक, शनी मंदिर परिसर, बालाजी मंदिर चौक, हरिरामनगर, श्री टॉकीज, राठी मार्गे फिरत तिलक चौक हनुमान मंदिरात समारोप झाला. १० वाजता स्टेशन चौकापासून दुचाकी, चार चाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत चित्रपट अभिनेत्री पुष्पा मुख्य आकर्षण होती तर रॅलीत महिला भगवा साड्या आणि फेटे घालून सहभागी झाल्या होत्या.
 
 
shobha yatra
 
Ram Janmabhoomi in Pulgaon  रॅली शहराच्या प्रमुख मार्गांवरून मंदिरात पोहोचली. दुपारी १२ वाजता श्रीरामजींचा जन्मोत्सव राम मंदिरात साजरा झाला. सायंकाळी ६ वाजता राम मंदिरापासून विविध सजीव झांकींसह शोभायात्रेचा प्रारंभ झाला. शोभायात्रेचे मुख्य आकर्षण मलखांब, आदिवासी नृत्य आणि इतर आकर्षक झांकी, बँड पथक होते. रात्री ८ वाजता स्टेशन चौक हनुमान मंदिर परिसरात भव्य महाआरती झाली. शोभायात्रेचा शहर भ्रमणादरम्यान ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. स्टेशन चौक येथे झांकींना पुरस्कार वितरण करून शोभायात्रेचा समारोप झाला.
Powered By Sangraha 9.0