रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली बड्या नेत्यांची एकजूट!

28 Mar 2026 18:26:42
मुंबई,
Ramdas Athawale रिपब्लिकन राजकारणातील विखुरलेली शकले एकत्र करून पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता मोठी राजकीय खेळी खेळली आहे. मुंबईतील पत्रकार संघातील एका सोहळ्यात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या एका मोठ्या गटासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी आठवलेंच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात (आरपीआय) जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे आंबेडकरी चळवळीत मोठी खळबळ उडाली असून, आठवलेंनी दिलेली एकजुटीची हाक भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे.
 

Ramdas Athawale leadership 
प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का देत मिलिंद सुर्वे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आठवलेंच्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला. केवळ रिपब्लिकन गटच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव यांनीही आपल्या समर्थकांसह आठवलेंचे नेतृत्व स्वीकारल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी बोलताना रामदास आठवले भावुक झाले. बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष साकारण्यासाठी आता सर्व छोट्या संघटनांनी आणि विचारवंतांनी एकत्रRamdas Athawale  येण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या सोहळ्याला अविनाश महातेकर, गौतम सोनवणे आणि सिद्धार्थ कासारे यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. या मोठ्या राजकीय ‘इनकमिंग’मुळे मुंबईसह राज्यातील आंबेडकरी चळवळीला नवीन बळ मिळाले असून, विखुरलेले गट आता खरोखरच आठवलेंच्या निळ्या झेंड्याखाली एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
लक्ष्य राष्ट्रीय पक्षाचे!रामदास आठवले यांनी यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या ‘नॅशनल प्लॅन’चाही खुलासा केला. नागालॅण्ड आणि मणिपूरनंतर आता आणखी दोन राज्यांत मान्यता मिळताच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. भाजपा, काँग्रेस आणि आपनंतर आपला पक्ष देशातील पाचवा मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष ‘गन्ना किसान’ या चिन्हासह उतरला असून, काही राज्यांत स्वबळावर तर, काही ठिकाणी भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
Powered By Sangraha 9.0