एमएनएलयू वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार

28 Mar 2026 14:41:23
नागपूर,
ragging in mnlu hostel नागपूर येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयू) च्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी चौथ्या वर्षाच्या बी.ए. एलएल.बी.च्या वरिष्ठ विद्यार्थिनी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

ragging  
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित या दोघीही विद्यापीठाच्या वसतिगृहात एकाच खोलीत राहत होत्या. दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या कनिष्ठ विद्यार्थिनीने आपल्या वरिष्ठ रूममेटकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मानसिक छळ होत असल्याची तक्रार केली आहे. किरकोळ कारणांवरून वारंवार त्रास देणे, अभ्यासाच्या वेळांवर निर्बंध घालणे, तसेच लाईट बंद करण्यास भाग पाडणे अशा प्रकारचे वर्तन आरोपीकडून केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, हिवाळ्यातील एका घटनेत आजारी असतानाही पीडित विद्यार्थिनीला रात्री पंखा पूर्ण वेगाने चालू ठेवण्यास भाग पाडण्यात आले. तिने पंख्याचा वेग कमी करण्याची विनंती केली असता आरोपीने नकार दिला. वॉर्डन व सुरक्षा रक्षकाच्या हस्तक्षेपानंतरही परिस्थिती बदलली नाही. परिणामी, पीडित विद्यार्थिनीला त्या रात्री दुसऱ्या विद्यार्थिनीच्या खोलीत जमिनीवर झोपावे लागले. याशिवाय, एका वादादरम्यान धक्काबुक्की करून पीडितेला किरकोळ दुखापत झाल्याचाही आरोप आहे. या सततच्या छळामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची दखल घेत विद्यापीठाच्या रॅगिंगविरोधी समितीने चौकशी केली.ragging in mnlu hostel समितीच्या अहवालाच्या आधारे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रकरण पोलिसांकडे सोपवण्यात आले. त्यानुसार बुटीबोरी पोलिसांनी रॅगिंगविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रकरणाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
Powered By Sangraha 9.0