काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणीत

28 Mar 2026 16:52:42
मुंबई
Sunetra Pawar राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत पती अजित पवार यांच्या स्मरणार्थ केलेली भावनिक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही पोस्ट शेअर केली असून त्यातून त्यांच्या वैयक्तिक भावविश्वाची झलक समोर आली आहे.
 

Sunetra Pawar  
२८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली होती. दोन महिन्यांनंतरही त्यांच्या आठवणी ताज्याच असल्याचे सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केले आहे.
“आज तुम्हाला जाऊन Sunetra Pawar  दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणीत गुंतले आहे,” असे लिहित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे त्यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील लोकाभिमुखता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि कामावरील झपाटलेपणा यांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या मते, अजित पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर अनेकांच्या आयुष्यात आशा आणि आधार देणारे व्यक्तिमत्त्व होते.सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे नमूद केले की, त्यांच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, मात्र त्यांच्या विचारांवर आणि शिकवणीवर चालत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन,” असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
दरम्यान, अजित पवार Sunetra Pawar  यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भावनिक पोस्टमुळे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्येही भावना व्यक्त होत असून सोशल मीडियावर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.
Powered By Sangraha 9.0