तीन शासकीय कार्यालयांवर ६१ लाखांचा कर बाकी

28 Mar 2026 20:46:33
मनोज रायपुरे
वर्धा
Tax due Wardha शहरातील तीन शासकीय कार्यालयांकडे तब्बल ६१ लाख ७६ हजार रुपयांचा कर बाकी आहे. मार्च महिना अंतिम टप्पयात असून या तीनही कार्यालयांनी अद्याप कर भरला नाही. यात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे सर्वाधिक ५२ लाख ३ हजार ४६७ रुपये एवढा कर बाकी आहे. शासकीय कार्यालयंच वेळेवर कराचा भरणा करत नसतील तर सर्व सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
waedha news 
Tax due Wardha मालमत्ता धारकांकडून मिळणार्‍या करातून नगर पालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देते. यामध्ये दिवाबत्ती, स्वच्छता पाणी आदींचा समावेश असतो. परंतु, मालमत्ताधारक नियमित कर भरत नसल्याने कोटींच्या घरात थकबाकी आहे. याचा परिणाम, नगर परिषदेच्या अर्थव्यवस्थेवर होते.
Tax due Wardha घरगुती मालमत्ता धारकांसोबतच शहरातील शासकीय कार्यालयांकडून पालिकेला दरवर्षी कोटींच्या घरात कर मिळतो. परंतु, यातील काही शासकीय कार्यालयंसुद्धा वेळेत कर भरत नसल्याचे पुढे आले आहे. यात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे तब्बल ५२ लाख ३ हजार ४६७ रुपये, तहसील कार्यालय ५ लाख ५२ हजार ९२९ रुपये, उपविभागीय कार्यालय महसूल ३ लाख ५ हजार ३७६ रुपये आणि जिल्हा ग्रामउद्योग कार्यालयाकडे १ लाख १४ हजार ४४० रुपये, असा तीन कार्यालयांकडे तब्बल ६१ लाख ७६ हजार रुपयांचा टॅस आहे. मार्च महिना अंतिम टप्प्यात असतानासुद्धा शासकीय कार्यालयांनी कर भरला नाही.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, विभागीय नियंत्रण, पोलिस अधीक्षक कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या शासकीय कार्यालयांनी वेळेत कर भरल्याचे नगर पालिकेकडून सांगण्यात आले.
Tax due Wardhaशासकीय कार्यालयांवर कर थकीत असल्यास नोटीस दिली जाते. जप्तीची कारवाई केली जात नाही. कार्यालयांता टाळे लावले तर सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे सर्वाधिक कर असल्याने त्यांच्या केवळ कार्यालयाला सिल लावले होते. क्रीडांगण, इनडोअर मैदान खुले असल्याने खेळाडू नागरिकांना याच फरक पडला नसल्याची माहिती नगर पालिकेकडून मिळली.
 
घरगुती, व्यावसायिकांकडे ३ कोटी थकबाकी
Tax due Wardha शहरात घरगुती आणि व्यावसायिक मालमत्ताधारकांची संख्या २८ हजार ४७६ आहे. त्यांच्याकडे थकीत व चालू असे ११ कोटी ८१ लाख ४० हजार रुपयांचा कर होता. २८ मार्चपर्यंत त्यापैकी ३ कोटी ४४ लाख ७१ हजार थकीत वसुली, तर चालू ५ कोटी १२ लाख २० हजार असे ८ कोटी ५६ लाख ९० हजार रुपयांची वसुली झाली असून ३ कोटी रुपये थकबाकी आहे.
 
अभय योजनेला प्रतिसाद
Tax due Wardha नगर पालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेला मालमत्ता धारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून थकीत कर व्याजाच्या रकमेत ५० टके सवलत दिली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेचा कर विभाग रविवार २९ आणि ३१ मार्च शासकीय सुटीच्या दिवशीसुद्धा सुरू राहणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0