मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच मॅचपूर्वी आले टेन्शन

28 Mar 2026 14:17:06
मुंबई,
Tension for Mumbai Indians बेस्ट बॉलर जसप्रीत बुमराह संघात सामील झाला, पण मॅचला १८ तास शिल्लक असतानाही पलटणचे दोन मॅचविनर खेळाडू अद्याप उपस्थित नाहीत. मुंबई इंडियन्सच्या हॉटेलवर बुमराह पोहोचला आणि तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचसाठी तयार आहे. मात्र इंग्लंडचा स्टार खेळाडू विल जॅक्स आणि न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर अजून स्कॉडमध्ये दाखल झालेले नाहीत. सँटनर अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-ट्वेंटी मालिकेत सहभागी झाला होता आणि त्यानंतर विश्रांती घेत आहे, तर विल जॅक्सच्या विलंबामागे कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही.
 
 
Tension for Mumbai Indians
 
मुंबईने सामन्यासाठी तीन नेट बॉलर्सही तयार ठेवले आहेत. आकाश मढवाल, रूशील उगारकर आणि सनी पटेल. हे खेळाडू थेट सामन्यात दिसणार नाहीत, पण संघाच्या सरावात महत्त्वाची भूमिका बजावतील. मुंबई इंडियन्सची परंपरा अशी आहे की, त्यांनी मागील १३ वर्षात कधीही सिझनमधील पहिली मॅच जिंकलेली नाही. यंदाच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हा इतिहास खंडीत होईल की नाही, हे आता पाहणे रंजक ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0