सिंदी (रेल्वे)
Massive accident वायगाव (निपाणी) येथून राळेगावकडे जात असताना कोसूर्ला नजीक समोरून येणार्या टिप्परने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात एक जागीच ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना शनिवार २८ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. हर्षल किन्नाके (२२) असे मृतकाचे तर राहुल किन्नाके (२८), सौरभ उईके (२३) अशी जखमींची नावे आहे.
Massive accident मिळालेल्या माहितीनुसार, राळेगाव तालुयातील सावंगी (पेरका) येथील हर्षल अरुण किन्नाके, राहुल राजू किन्नाके आणि सौरभ विष्णू उईके हे तीन युवक सावंगी येथून सकाळी वायगाव (निपाणी) येथे वसतिगृहातून सौरभची टीसी आणण्यासाठी गेले होते. एम. एच. ३२ एल. ६५९१ क्रमांकाच्या दुचाकीने तिघेही गावाकडे परत येत असताना समोरून येणार्या एम. एच. २२ ए. एन. २९११ क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक हर्षल किन्नाके याचा टिप्परच्या चाकाखाली येऊन घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राहुल किन्नाके आणि सौरभ उईके हे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वायगाव ते कान्होली (कात्री) चौरस्तापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची एक बाजू पूर्ण खोदून ठेवली आहे. परिणामी, वाहनधारकांना वाहन कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. Massive accident वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु, संबंधित ठेकेदाराने तशी व्यवस्था केली नाही. वाहने जाण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यातून हा अपघात घडला असावा, अशी चर्चा आहे. शिवाय सदर टिप्पर रस्त्याच्या कामावरील होता असे समजते.
या प्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी पंचनामा करून तपास ठाणेदार विजयकुमार घुले आणि सहकारी करीत आहे.