मजुरांनी भरलेल्या दोन ट्रॉल्या पलटून भीषण अपघात

28 Mar 2026 20:39:49
१ महिला ठार : ९ जखमी

पुसद, 
शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी मन हेलावून टाकणारी घटना घडली. ऊस तोडीवरून आपल्या राहत्या घरी परत येत असताना, घरापासून केवळ २ किमी अलीकडे, मजुरांनी भरून असलेल्या दोन Tractor trolley accident ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्या. या भीषण अपघातामध्ये महिला ठार झाली असून, एकूण नऊ जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. घटनेची प्राथमिक माहिती अशी की, पुसद तालुक्यातील धनज, वेणी, धनसळ, मरसूळ येथील मजूर ऊस तोडीकरिता लातूर येथे गेले होते. ऊसतोडीचा हंगाम पूर्ण करून, हे कुटुंब पुसद तालुक्यातील आपापले राहते घरी येण्याकरिता निघाले. शुक‘वार, २७ मार्च रोजी रात्री मजुरांनी वारंगा फाट्याजवळ असलेल्या बसस्थानकावर मुक्काम केला.
 

Tractor trolley accident 
 (संग्रहित छायाचित्र )
 
सकाळी ६ वाजता हे मजूर पुन्हा घराच्या दिशेने निघाले. सकाळी साडेदहाच्या सुमारास मजुरांनी भरून असलेल्या २ ट्रॅक्टर ट्रॉल्या धनजपासून केवळ दोन किलोमीटर अलीकडे असताना, उतारामध्ये वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाल्या. नेमके या दोन ट्रॉल्यांमध्ये किती मजूर होते, याची माहिती मिळू शकली नाही. त्यापैकी, अभिषेक शंकर धुर्वे (वय ५), मथुरा हळसे, सुनीता माधव गुहाडे, रामराव मारोती व्यवहारे, बालाबाई दौलत भडंगे, सुशीला दत्ता हाळसे, रेखा संतोष धुर्वे, अनिता संतोष ढंगारे, अर्चना राम व्यवहारे, विलास संतोष ढंगारे या दहा जणांना शासकीय पुसद उपजिल्हा रुग्णालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास आणण्यात आले.
 
 
तेथे उपस्थित डॉक्टरांनी जखमींची तपासणी असता, Tractor trolley accident जखमींपैकी अर्चना राम व्यवहारे या महिलेस मृत घोषित केले. एकूण ९ मजुरांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना यवतमाळला पाठवण्यात आले आअसून उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. अशीच एक घटना एक महिन्यापूर्वी घडली होती. ऊस तोडीवरून पुसदकडे परत येणार्‍या गोपवाडी येथील मजुरांचा अपघात होऊन त्यात तीन मजूर व एक यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Powered By Sangraha 9.0