शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य महोत्सवाचे केंद्रबिंदू
पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन
यवतमाळ,
'Yavatmal Festival 2026' राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तर कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र येथे आयोजित २७ ते मार्च अशा पाच दिवसीय भव्य ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ चे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक‘माला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, मु‘य कार्यकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, विभागीय आरबीडीसी पवन देशमुख, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक कच्छवे यांच्यासह विविध विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, यवतमाळ महोत्सव हे केवळ प्रदर्शन नाही, तर हा शेतकरी केंद्रीत आणि त्यांच्या प्रगतीचा उत्सव आहे. यात कृषी व पशुप्रदर्शन होत आहे. जिथे आधुनिक शेती आणि नव्या पशू जातींची माहिती दिली जात आहे. उमेदमार्फत समृद्ध मिनी सरस व माविममार्फत नवतेजस्विनी प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या कष्टाला बाजारपेठ मिळाली आहे. सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची कला-संस्कृती जोपासली जात आहे. ग‘ंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना दिली जात आहे. तसेच छत्रपती महाराज महाराजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून शेतकरी व महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांचे महसूल विषयक कामे एकाच ठिकाणी होत आहेत, असेही ते म्हणाले.
'Yavatmal Festival 2026' या यवतमाळ महोत्सवाच्या माध्यमातून विविध सेवांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून येत्या नोव्हेंबरमध्ये पुन्हा अशा भव्य महोत्सवाचे आयोजन करून शेतकरी, महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार पालकमंत्र्यांनी सांगितले. उद्घाटन समारंभाच्या शेवटी, पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतकरी, राज्य शासनाच्या पुरस्कारप्राप्त शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग‘ह योजनेअंतर्गत वारसदारांना लाभाचे प्रमाणपत्र, माविमच्या महिला बचतगटांना अनुदान प्रमाणपत्र आणि अॅट्रॅासिटी बाधितांच्या वारसांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.