यवतमाळ नगर परिषद समोरचे आंदोलन मागे

28 Mar 2026 19:41:42
२० एप्रिलपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

यवतमाळ, 
यवतमाळ नगर परिषद समोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाची शुक‘वार, २७ मार्चला सांगता करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेनंतर Yavatmal Municipal Council नगर परिषद प्रशासनाने समिती गठित करून सर्व मागण्यांवर कार्यवाही करत २० एप्रिल २०२६ प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. ब्लु भीम टायगर अस्थायी कामगार सेनेचे अध्यक्ष श्याम बनसोड यांनी मांडलेल्या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या संदर्भात नगर परिषद प्रशासनाकडून अधिकृत पत्रही देण्यात आले आहे.
 
 
np ytl
 
Yavatmal Municipal Council मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या पत्रानुसार, ‘समान काम समान वेतन’ या मुद्यावर शासन नियमांनुसार अभ्यास करून कार्यवाही केली जाईल. कंत्राटी सफाई कामगारांवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी संबंधित कंत्राटदारांना सूचना देण्यात येणार आहेत. २०२१ ते २०२५ या कालावधीतील वेतन तफावत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल. सर्व पात्र कामगारांना लाभ मिळण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी केली जाणार आहे. वारस हक्क समितीच्या शिफारशी आणि कंत्राट प्रकि‘येत संघटनांच्या प्रतिनिधींना करून घेण्याबाबतही सकारात्मक विचार करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यावेळी नप अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, दत्ता कुलकर्णी, नितीन गिरी, ओम तिवारी, उमेश मेश्राम, मु‘याधिकारी शुभम क्यातमवार, नागेश कपाटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याने शांततेच्या मार्गाने सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यानुसार सांगता करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0