येमेनची युद्धात एंट्री; इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा

28 Mar 2026 10:40:19
जेरुसलेम,
Yemen's entry into the war पश्चिम आशियातील तणाव अधिक तीव्र होत असताना आता येमेननेही या संघर्षात उडी घेतली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर येमेनमधील हौथी बंडखोरांनी इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे. या हल्ल्यामुळे दक्षिण इस्रायलमधील बेअरशेबा आणि आसपासच्या भागात इशारा देणारे सायरन वाजू लागले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 
 

Yemen 
 
वृत्तांनुसार, या संघर्षात इराणच्या पाठिंब्याने हौथींनी इस्रायलवर केलेला हा पहिलाच हल्ला मानला जात आहे. इस्रायली लष्कराने सांगितले की, येमेनच्या दिशेने डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राची नोंद घेण्यात आली असून त्याला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे काही महत्त्वाच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
लाल समुद्रात हल्ले करणार
गेल्या काही तासांत इराण आणि त्याच्या सहयोगी गटांकडून इस्रायलवर हल्ल्यांची मालिका सुरूच असल्याचेही सांगितले जात आहे. दक्षिण भागात आणि अणुसंशोधनाशी संबंधित संवेदनशील परिसरांजवळ वारंवार सायरन वाजल्याने तणाव अधिक वाढला आहे. यापूर्वीच येमेनमधील हौथी बंडखोरांनी स्पष्ट इशारा दिला होता की, जर इराणविरुद्धच्या कारवाईत इतर देश सहभागी झाले किंवा लाल समुद्राचा वापर करून हल्ले करण्यात आले, तर ते थेट लष्करी हस्तक्षेप करतील. आता त्यांच्या प्रत्यक्ष कारवाईमुळे हा संघर्ष अधिक व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0