संतप्त नागरिकांनी अडविला तिरोडा साकोली मार्ग
साकोली :
Bambewada and Umarzari: Tigresses in a frenzy तालुक्यातील बाम्बेवाडा आणि उमरझरी वाघिणीने घातलेल्या धुमाकूळामुळे विकासा जीव गेला तर एक महिला मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज तिरोडा साकोली राज्यमार्ग अडवून आपला रोष व्यक्त केला. वाघिणीचा ताबडतोब बंदोबस्त करून ग्रामस्थांची भीती दूर करावी आणि विविध त्यांच्या कुटुंबीयांना मदत द्यावी अशी मागणी लावून भरलेल्या आंदोलकांनी 2 ते 3 तास मार्ग अडवला होता.
बाम्बेवाडा येथे एका इसमाचा दोन दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर काल एक महिला गंभीर जखमी. यां घटनेनंतरही वाघिणीचा वावर उमरझरी परिसरात असल्याचे व्हिडिओ पुढे येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतीच्या कामासाठी बाहेर पडणे आणि अन्य गोष्टी कठीण होऊन बसल्या आहेत. या भीतीच्या सावटाखाली जगत असलेल्या ग्रामस्थांच्या संतापाचा आज उद्रेक झाला.
Bambewada and Umarzari: Tigresses in a frenzy संतप्त नागरिकांनी साकोली–तिरोडा मार्ग रोखून धरला. माजी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. कालच्या जखमी माया सोनवाने यांना वेळेत मदत आणि उपचार न मिळाल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी नेपाल रंगारी यांच्या नेतृत्वात प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत साकोली–तिरोडा मार्ग पूर्णपणे बंद केला. आंदोलना दरम्यान संतप्त जमावाने जाळपोळही केली, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. जोपर्यंत या नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त होत नाही आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
वन विभागाची शोधमोहीम तीव्र
घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात आला असून विशेष बचाव पथकला आणण्यात आले. वाघिणीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात तात्पुरता टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. नरभक्षक वाघीण दिसताच तिला बेशुद्ध करून पकडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनाचे आवाहन आणि सतर्कता
सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि वन विभागाचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वाघिणीला पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि ड्रोनचा वापर करण्याबाबतही हालचाली सुरू आहेत.