मुंबई
Bhool Bhulaiyaa छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ रिअॅलिटी शो ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ सध्या आपल्या मनोरंजक आणि हसवणाऱ्या भागांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अलीकडेच प्रसारित झालेल्या एका विशेष भागाने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगवली असून, त्यामध्ये अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांनी केलेल्या भन्नाट कॉमेडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘भूत बंगला’ या विशेष भागात एकता कपूर, वामिका गब्बी आणि राजपाल यादव हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमधील एका चाहत्याने अक्षय आणि राजपाल यांना त्यांच्या भूल भुलैया या चित्रपटातील प्रसिद्ध ‘पाणी’ सीनची आठवण करून दिली. या निमित्ताने एकता कपूर यांनी दोघांना तो सीन पुन्हा सादर करण्याची विनंती केली आणि त्यानंतर रंगला खरा धमाल क्षण.अक्षय कुमार यांनी ‘पाणी’ असा उच्चार करताच राजपाल यादव यांनी नेहमीप्रमाणे उडी मारत दिलेली प्रतिक्रिया पाहून उपस्थित प्रेक्षक आणि सेलिब्रिटी पाहुणे पोट धरून हसू लागले. या कॉमिक अॅक्टने कार्यक्रमाला रंगत आणली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.या व्हिडिओसोबत मेकर्सनी दिलेल्या कॅप्शनमध्ये ‘कॉमेडीचे खरे खेळाडू’ अशी अक्षय आणि राजपालची प्रशंसा करण्यात आली आहे. त्यांच्या अभिनयावर एकता कपूर आणि वामिका गब्बी यांनीही आश्चर्य व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव Bhool Bhulaiyaa केला.अक्षय कुमार आणि राजपाल यादव ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी कॉमेडी जोड्यांपैकी एक मानली जाते. त्यांनी फिर हेरा फेरी आणि गरम मसाला यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. विशेषतः ‘भूल भुलैया’मधील छोटा पंडित हे राजपाल यादव यांचे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
दरम्यान, ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असून, ‘भूत बंगला’ हा त्यांचा आगामी चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे.