डॉ. बाजपेयीने गोंदियातही विक्री केले दोन बालके

29 Mar 2026 21:13:34
- बनावट नोंद करून जन्म प्रमाणपत्रही घेतल्याचे तपासात उघड
- रामनगर पोलिसात गुन्हा दाखल
 
गोंदिया, 
भंडारा जिल्ह्यातील  case of baby selling बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याच्या विरोधात गोंदियाच्या रामनगर पोलिसात पुन्हा एक गुन्हा नोंदविण्यात आला असून न्यू बालाजी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात वाजपेयीने आणखी दोन नवजात बालकांच्या जन्माची बनावट नोंद करून नगर परिषदेतून त्यांचे जन्म प्रमाणपत्र हस्तगत करून त्या बाळांची विक्री केल्याचा गंभीर प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. त्यामुळे डॉ. बाजपेयीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
 

babky 
 
 (संग्रहित छायाचित्र )
 
case of baby selling भंडारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत नितेश बाजपेयी याने अनेक बालके विक्री केल्याचे पुढे आले होते. दरम्यान, गोंदियात एका बाळाची विक्री केल्याप्रकरणी आधीच त्याच्याविरोधात गुन्हा नोंद असताना आणखी दोन बालके विक्री केल्याची घटना २७ मार्च रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार १० ऑक्टोबर २०२४ ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपीने आर्थिक फायद्यासाठी आपल्या न्यू बालाजी हॉस्पिटल येथे तिरोडा येथील वय १ वर्ष ६ महिने, व कोडेलोहारा येथील ५ महिने १० दिवस वयाच्या दोन नवजात बालकांच्या जन्मासंदर्भात खोटी कागदपत्रे तयार करून नगर परिषद गोंदिया येथे बनावट अहवाल सादर करून जन्म प्रमाणपत्र तयार करून घेतले. त्यानंतर या नवजात बालकांचे बेकायदेशीर दत्तकग्रहण करून त्यांची विक्री केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी, गोंदिया यांच्या आदेशानुसार व चौकशी अहवालाच्या आधारे आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ३२२, ३१८ (४),३३६ (२), ३४० (२) तसेच बालकांचे हक्क व संरक्षण कायदा कलम ८०, ८१ अंतर्गत रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0