घरगुती गॅसबाबत तक्रार निवारणासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयात कक्ष स्थापन

29 Mar 2026 19:37:48
अकोला.
Complaint regarding domestic gas जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅसच्या सुरळीत वितरणाकरिता, तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याकरिता जिल्हा स्तरावर दक्षता व फिरत्या पथकाद्वारे तपासण्या होत आहेत. त्याचप्रमाणे, जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा कार्यालयात तक्रार निवारण कक्ष" स्थापन करण्यात आला आहे. त्याचा संपर्क क्र. 8010153780 हा आहे.
 
 
gas
 
Complaint regarding domestic gas  सद्य:स्थितीमध्ये पेट्रोल,डिझेल, व घरगुती गॅस या इंधनासंदर्भात प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अकोला जिल्ह्यातील नागरिकांकडून दूरध्वनी संदेशाद्वारे प्राप्त होणा-या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हा कक्ष स्थापण्यात आला आहे. तक्रार निवारण कक्षामध्ये अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरवठा अधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस एजन्सीमध्ये अनावश्यक गर्दी करू नये. गॅस सिलेंडरबाबत आपणास काही अडचण समस्या असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. हेल्पलाईन क्र. 8010153780 हा आहे.
Powered By Sangraha 9.0