सिलेंडर ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये

29 Mar 2026 18:34:57
किशोर काकाणी यांचे आवाहन
ग्राहकांच्या रांगा
 
कारंजा लाड, 
Customers rush for cylinders तालुक्यातील कामरगाव येथे गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर टंचाईच्या अफवांनी अक्षरशः गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिलेंडर मिळणार नाहीत, पुरवठा बंद होणार अशा चर्चांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याच भीतीपोटी ग्राहकांनी गॅस एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दररोज सकाळपासूनच कामरगावातील गॅस वितरण केंद्रांपुढे ग्राहकांच्या लांबचलांब रांगा लागतात. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने सिलेंडर घेण्यासाठी तासनतास उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी शिस्तीचा अभाव आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचेही समोर आले आहे.
 
 
cylinders
 
Customers rush for cylinders दरम्यान, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्यामुळे अनावश्यक गर्दी वाढली आहे. या संदर्भात इंडेन गॅसचे संचालक किशोर काकानी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कंपनीच्या पुरवठ्यानुसार पुरवठा सुरू आहे. अनावश्यक घाई आणि साठेबाजी टाळा. त्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अफवांमुळे गरज असलेल्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे वितरण व्यवस्थेवर ताण येत असून, त्यामुळे पुरवठा प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
Powered By Sangraha 9.0