दहेगावचा पोलिस पाटीलच दारूच्या नशेत

29 Mar 2026 20:50:30
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
 
वर्धा, 
Dahegaon Police Patil गावखेड्यात शासन, प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये मध्यस्थी करण्याची जबाबदारी पोलिस पाटलाची असते. पोलिस पाटलाला गावात आणि प्रशासनातही प्रतिष्ठा असते. त्युमुळे पोलिस पाटलावर गावाची मोठी जबाबदरी असेत. परंतु, दहेगाव (गावंडे) येथे पोलिस पाटीलच दारूच्या नशेत आढळून आला. पोलिसांसोबतच वाद घालू लागल्याने सावंगी पोलिसांनी पोलिस पाटलावर गुन्हा दाखल केला.
 
 
fir
 
Dahegaon Police Patil  मिळालेल्या माहितीनुसार, दहेगाव (गावंडे) येथे संजय खोब्रागडे यांची पोलिस पाटील म्हणून नेमणूक करण्यात आलाी आहे. गावचा पोलिस पाटील म्हणजे मुख्यच! गावात शांतता, सौदार्ह राखण्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी पोलिस पाटलाची असते. १७ मार्च रोजी रात्री ११ वाजता गावात वाद झाल्याची माहिती पोलिसांना ११२ क्रमांकावर फोन आला. फोन येताच सावंगी येथील पोलिस दहेगाव येथे पोहोचले. चौकशी करीत असतानाच पोलिस पाटील दारूच्या नशेत होता. पोलिसांच्या चौकशीतही पोलिस पाटील खोब्रागडे ढवळाढवळ करीत होता. या संदर्भात पोलिसांना शंका आल्याने पोलिस पाटील खोब्रागडे याला ताब्यात घेऊन वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आले. खोब्रागडे दारूच्या नशेत असल्याचा वैद्यकीय अहवाल आला. त्या आधारे सावंगी पोलिसांनी खोब्रागडे याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी कारंडे यांच्याकडेही अहवाल पाठवण्यात आला असल्याची माहिती सावंगीचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांनी दिली. पोलिस पाटील खोब्रागडे याचा दारू पिण्याचा नेहमीचा प्रकार होता, असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0