चित्रपटांतून भारताची ताकद जगाला कळावी

29 Mar 2026 21:46:51
चित्रपट महाेत्सवात रंगला रणदीप हुड्डा यांचा मास्टरक्लास
युवा आणि चित्रपटाविषयी मनमाेकळा संवाद

नागपूर, 
Film Festival आपण महाशक्ती असल्याचे नॅरेटिव्ह चित्रपट आणि माध्यमांच्या साथीने अमेरिकेने निर्माण केले आहे. पण हे सगळे खाेटे असून आपल्या देशातील चांगल्या गाेष्टी जगापर्यंत पाेचविण्यासाठी आपल्यालाही नॅरेटिव्हचा आधार घ्यावाच लागेल. यासाठी आपल्यालाही चित्रपट या सशक्त माध्यमाचा आधार घेत जगाला आपली ताकद दाखवावी लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुड्डा यांनी केले.
 
 
randeep dksl
 
Film Festival राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, भारतीय चित्र साधना आणि नागपूर चलचित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात आयाेजित नागपूर चित्रपट महाेत्सवात भारतीय युवा आणि चित्रपट या मास्टरक्लासमध्ये त्यांनी युवांशी मनमाेकळा संवाद साधला. काेमल मेहता यांंच्यासह युवांनी त्यांच्याशी  संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे वर्चस्ववादी नॅरेटिव्ह ताेडण्याची गरज अधाेरेखित केली. चित्रपट निर्माण करताना निर्मात्याची नैतिक जबाबदारी काय? असे विचारले असता रणदीप म्हणाले, चित्रपट हा प्रथमतः मनाेरंजनासाठी तयार हाेताे. ती तुमची गरज आहे. त्यामुळे आधी चांगला आणि प्रेक्षणीय चित्रपट तयार करणे ही प्राथमिकता असावी. नैतिकता ही फार नंतरची बाब असल्याचे ते यावेळी म्हणाले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाबाबतचे अनुभव सांगताना ते म्हणाले, खरे तर हा चित्रपट मी खूप तळमळीने बनविला. लाेकांपर्यंत माहिती नसलेले खरे सावरकर माहिती व्हावे त्यासाठी यासाठी मी प्रचंड अभ्यास केला. मुळात सावरकर समजणे साेपे नाही. भारतीय जनमानसाला त्यांची ओळख व्हावी यासाठी इंग्रजी आणि हिंदीत त्याची निर्मिती केल्याची माहिती त्यांनी दिली.

चुकांतून शिका
तुमच्या मातीतील गाेष्टी तुमच्याच लाेकांना घेऊन मांडा, असे सांगतानाच अपयशाला न घाबरता चुकांतून शिका असा सल्लाही त्यांनी चित्रपटात करिअर करू इच्छिणाèया युवांना दिला. आजवरच्या चित्रपट प्रवासात ‘लाल रंग’ या चित्रपटातील शंकर मलिकची भूमिका माझी सर्वात आवडती असल्याचे ते यावेळी म्हणाले. नॅरेटिव्ह, प्राेपगंडा यासह इतरही ज्वलंत विषयावरील प्रश्नांना त्यांनी मनमाेकळी उत्तरे दिली.
Powered By Sangraha 9.0