महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार

29 Mar 2026 18:18:54
भानखेडच्या जंगलातील घटना
पाच जणांना तातडीने अटक
 
अमरावती, 
Gang rape case अठरा वर्षाची महाविद्यालयीन तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवर चांदुर रेल्वे मार्गाने फिरायला गेली होती. ते दोघे परत येत असताना पाच जणांनी त्यांना पकडले. दोघांनाही मारहाण केली. त्यापैकी एकाने तरुणीला जंगलात ओढून नेत जबरीने तीच्यावर बलात्कार केला. इतरांनी तीच्या मित्राला पकडून ठेवले. ही थरारक घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास उघड झाली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून रविवारी पहाटेपर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
 
 
Gang rape case
 
Gang rape case  महाविद्यालयीन तरुणी शनिवारी रात्री तिच्या मित्रासोबत वडाळी परिसरात गेली होती. पुढे ते दोघे दुचाकीने फेरफटका मारण्यासाठी चांदुर रेल्वे मार्गाने गेले. या मार्गावरुन भानखेडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याजवळ तरुणीचा दुपट्टा खाली पडल्यामुळे ते थांबले. त्यावेळी अनोळखी पाच जण त्यांच्याजवळ आलेत व दोघांनाही पकडले. त्यांना मारहाण करून तुमच्याकडे असलेले पैसे द्या, अशी मागणी केली. त्यावेळी घाबरलेल्या तरुणीने तिच्याजवळ असलेले १२० रुपये त्यांना दिले. चौघांनी तरुणीच्या मित्राला पकडून ठेवले तर एकाने तरुणीला जंगलाच्या आतमध्ये ओढत नेऊन तब्बल अर्धा ते पाऊन तास जबरीने व अमानुषपणे अत्याचार केला. झालेल्या प्रकाराबाबत कोणालाही माहिती दिल्यास जीवाने मारून टाकेल, अशी धमकी तरुणी व तीच्या मित्राला आरोपींनी दिली. सुमारे तासाभराच्या या थरारानंतर तरुणी व तीच्या मित्राला आरोपींनी रस्त्यावर आणून सोडले. तसेच त्यांची दुचाकी परत केली. झालेल्या प्रकाराने तरुणी व तिचा मित्र चांगलेच घाबरले. या संपूर्ण घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. शहरात आल्यानंतर तरुणी रुग्णालयात पोहोचली. त्या ठिकाणी तीला दाखल करून घेण्यात आले. पीडित तरुणीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहे.
Powered By Sangraha 9.0