हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

29 Mar 2026 15:41:02
नागपूर,
Hanuman Jayanti हनुमान जयंती निमित्त गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी पश्चिमेश्वर हनुमान मंदिर, बाजीप्रभु चौक, रामनगर, येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
hnuman
 
पहाटे ५.३0 वाजता ह.भ.प. सुरेशबुवा खापेकर यांच्या उपस्थितीत हनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर सकाळी ६ वाजता हनुमान जन्म सोहळा साजरा करण्यात येईल. Hanuman Jayanti दिवसभर भाविकांसाठी प्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.संध्याकाळी ६.३0 वाजता प्रसिद्ध गायक पंडित राजेंद्र शर्मा,यांचे संगीतमय सुंदरकांड सादर करण्यात येणार आहे. रात्री ७ वाजल्यापासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0