आसाम,
Jorhat gas explosion आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील राजामैदाम न्यू कॉलनीमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास भाड्याच्या घरात भयंकर स्फोट झाला. या धक्कादायक घटनेत एका मुलीसह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जोरहाटचे वरिष्ठ Jorhat gas explosion पोलीस अधीक्षक सुभ्रजित बोरा यांनी सांगितले की, मृतांची ओळख नूर मोहम्मद (४०) आणि नैना बेगम (८) अशी झाली आहे. जखमींमध्ये एका सात वर्षांच्या मुलीचा आणि एका शेजाऱ्याचा समावेश आहे. सर्व जखमींना तत्काळ जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्या मुलीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.घटनेची ठिकाण भाड्याचे घर असून, तो घर भंगार विक्रेत्याचा होता. स्फोट इतका भयंकर होता की खोलीच्या भिंतींना मोठे नुकसान झाले, जमिनीवर खड्डा पडला आणि शरीराचे अवयव विखुरले गेले. सुरुवातीला एलपीजी सिलेंडरच्या स्फोटाचा संशय होता, पण पोलिसांनी तो त्वरित फेटाळून लावला आहे. पोलिसांना असा संशय आहे की, हा स्फोट अग्निशामक यंत्राशी खेळ करताना किंवा हातोड्याने प्रहार केल्यामुळे झाला असावा.
जोरहाट पोलीसांनी सहा Jorhat gas explosion जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करणे सुरू केले आहे. सध्या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोटाचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.ही घटना आसाम विधानसभा निवडणुकीच्या अगदी अगोदर घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.