कराटे प्रशिक्षणातून ४७ वनरक्षक झाले सज्ज

29 Mar 2026 21:58:22
१० दिवसांचे विशेष शिबिर उत्साहात
दीक्षांत समारंभाने सत्राची सांगता

पांढरकवडा, 
Karate training for forest guards येथील यवतमाळ जिल्हा असोसिएशनच्या तज्ञ व अनुभवी कराटे प्रशिक्षकांकडून चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशिक्षणार्थी वनरक्षकांसाठी विशेष कराटे व आत्मसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. वन प्रशिक्षण संस्थेत ४७ अप्रशिक्षित वनरक्षकांना दिलेले आत्मसंरक्षणाचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले. शनिवार, २८ मार्च रोजी पार पडलेल्या दीक्षांत समारंभाने या प्रशिक्षण सत्राची अधिकृत सांगता चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेत १ ऑक्टोबर २०२५ पासून ‘पायाभूत प्रशिक्षण सत्र क‘मांक ६३’ राबविण्यात येत होते. या सत्राचा महत्त्वाचा भाग म्हणून १६ ते २६ मार्च या १० दिवसांच्या कालावधीत वनरक्षकांसाठी विशेष कराटे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
karatwe
 
या प्रशिक्षणासाठी यवतमाळचे प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक डॉ. आनंद भुसारी, योगेश पडोळे हितेश नागभीडकर यांनी वनरक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. यवतमाळ जिल्ह्यातील प्रशिक्षकांनी दिलेल्या या दर्जेदार निपुणतेमुळे वनरक्षकांचे मनोबल उंचावले आहे.
जंगलात कर्तव्यावर असताना हिंस्र श्वापदे किंवा समाजकंटकांशी सामना करावा लागतो. अशा वेळी स्वतःचा बचाव कसा करावा, याचे शास्त्रोक्त धडे या ४७ वनरक्षकांना देण्यात आले. १० दिवसांच्या या सत्रात शारीरिक चपळता आणि कणखरता वाढविण्यावर भर देण्यात आला.
 
 
Karate training for forest guards  शनिवार, २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता वन प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर पासिंग आऊट परेड व दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक‘माला प्रमुख अतिथी म्हणून सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे उपस्थित होत्या. तसेच मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी अनंत डिगोळे यांची विशेष उपस्थिती संस्थेच्या संचालक मुक्ता टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण प्रशिक्षण सत्र यशस्वीरीत्या पूर्ण झाले. दुर्गम भागात काम करणार्‍या वनरक्षकांसाठी हे कराटे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला.

पहिलेच अभिनव प्रशिक्षण
वनविभागाच्या इतिहासात चिखलदरा येथील प्रशिक्षण वनरक्षकांसाठी अशा प्रकारचे ’कराटे प्रशिक्षण’ पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. जंगलात गस्त घालताना हिंस्र श्वापदे किंवा लाकूड तस्कर व शिकारी लोकांशी सामना करताना विनाशस्त्र स्वतःचा बचाव कसा करावा, याचे शास्त्रोक्त धडे या प्रशिक्षणातून देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0