- ओम राऊत यांचा युवा कलाकारांना सल्ला
- नागपूर चित्रपट महाेत्सवाचा समाराेप
नागपूर
Nagpur Film Festival आजचे चित्रपट केवळ काॅन्ट्राेवर्सीमुळे लक्षात राहतात ही धारणा रूढ झाली आहे. त्यामुळे वाद हाेतील असे मुद्दे चित्रपटात घालून ते प्रदर्शित केले जातात. परंतु समाजाला चांगल्या गाेष्टी सांगणे हा चित्रपटाचा उद्देश असावा. त्याही पुढे जाऊन नव्या भारताच्या कथा चित्रपटातून जगाला कळाव्या, असे चित्रपट तयार करा असे मार्गदर्शन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांनी केले.
Nagpur Film Festival राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि नागपूर चलचित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित नागपूर चित्रपट महाेत्सवाचा समाराेपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ओम राऊत बाेलत हाेते. लाेकमान्य टिळक यांच्या केसरी वृत्तपत्रातील अग्रलेखाबाबतच्या विधानाचा दाखल देत ते म्हणाले,‘ कुठलाही अग्रलेख लिहिताना एक पाऊल कायद्याच्या कक्षेत तर दुसरे पाऊल चाैकटीच्या बाहेर असायला हवे, असे टिळक सांगायचे. पत्रकारिता, चित्रपटासाठी हे तंताेतंत लागू हाेते.’ चित्रपट हा चांगल्या कारणासाठी स्मरणात असायला हवा. 90 च्या दशकात भारतीय चित्रपटांतून काही चुकीच्या गाेष्टींचे आणि पात्रां चे उदात्तीकरण करण्यात आले. मात्र आता स्थिती बदलत आहे. देशातील अभिमानास्पद गाेष्टी चित्रपटाच्या पडद्यावर यायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. चित्रपट महाेत्सवात 20 राज्यातून 21 भाषांमधील 304 चित्रपट दाखविण्यात आले समाराेपीय कार्यक्रमात राऊत यांच्या हस्ते विविध प्रवर्गातील सर्वाेत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देण्यात आले.
पुरस्कार
बेस्ट प्राेेशनल शाॅर्ट फिल्म ः प्रथम - रंग, द्वितीय - द फर्स्ट फिल्म, तृतीय - केकी
बेस्ट प्राेेशनल डाॅक्युमेंट्री फिल्म ः प्रथम - डिस्क्रेनिंग इंडिया, द्वितीय - अर्थ गंगा, तृतीय - शहाराह द राॅयल रूट
बेस्ट अॅमेच्यूअर ऑर्ट फिल्म ः प्रथम - पैज मराठीची, द्वितीय, द्वितीय - ब्लॅक ाॅरेस्ट, तृतीय - इन सर्च ऑफ बुद्धा
बेस्ट अॅमेच्यूअर डाॅक्यूमेंट्री फिल्म ः प्रथम - टायगर स्पिंग, द्वितीय - नागरिक कर्तव्य, तृतीय - तहानलेला दाता
बेस्ट अॅनिमेशन ः प्रथम - लेस, द्वितीय - पुराना दुष्मन नया रूप, तृतीय - बिकाॅन ऑफ लाईट
रील व्हर्टिकल कॅटेगिरी ः प्रथम - व्हेअर इज बाेस, द्वितीय - भारत माता की जय, तृतीय - सावित्री
एआय जनरेटेड मूव्हीज ः प्रथम - एलओसी(लीगसी ऑफ छत्रपती), द्वितीय - द लास्ट वंडर्ड, तृतीय - पब्लिक वायाय
प्राेेशनल गटात बेस्ट डायरेक्टर - द फर्स्ट फिल्म, स्क्रीन प्ले - रंग, सिनेमेटाेग्राी - केकी, एडिटिंग - स्मृती, बेस्ट अॅक्टर - कसाकी कानासिन्हा कागडा, बेस्ट अॅक्ट्रेस - मलार,
अॅमेच्यूअर गटात बेस्ट डायरेक्टर - ब्लॅक ाॅरेस्ट, स्क्रीन प्ले - इन सर्च ऑफ बुद्धा, सिनेमेटाेग्राी - कर्ज ऑफ माओ , एडिटिंग - इन सर्च ऑफ बुद्धा , बेस्ट अॅक्टर - ब्लॅक ाॅरेस्ट , बेस्ट अॅक्ट्रेस - राऊंड अबाऊट,