शारदा चौकात रामनवमी उत्साहात साजरी

29 Mar 2026 13:30:18
नागपूर ,
Old Subhedar, Sharada Chowk जुना सुभेदार,परिसरातील शारदा चौक येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. परशु ठाकुर यांच्या नेतृत्वात तसेच नगरसेविका रूपाली ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले.
 
 
mug
 
 
खानखोजे नगर येथील महाकाली मंदिरातून शेकडो महिलांनी कलश यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही यात्रा परिसरात फिरत शारदा चौकात पोहोचली. येथे आकर्षक रामदरबाराची झांकी साकारण्यात आली होती. त्याठिकाणी प्रभू श्रीरामांची पूजा-अर्चना व आरती करण्यात आली. Old Subhedar, Sharada Chowk या कार्यक्रमाला आमदार प्रवीण दटके, मोहन मते, नगरसेवक पिंटू झलके, मधुभाऊ घाटे, गुलाबराव नाल्हे, अमित देसाई, राजू मुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर जवदंड, आशिष नंदनवार, अमर वनकर, अभिजीत मुटकुळे, वैभव उमप, यांच्यासह शेकडो महिला व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:वैभव जोशी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0