सैलानीला जाताना पिकअपचा भीषण अपघात

29 Mar 2026 21:25:24
बुलढाणा, 
Pickup accident सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाताना नांद्रा धांडे फाट्याजवळ पिकअप उलटून झालेल्या अपघातात अदनान शरीब बागवान व रिहान सय्यद बागवान या दोघांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या लहान मुले, सहा महिला व पुरुष अशा १४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
picukp
 
Pickup accident  अहमदपूर येथून बागवान परिवारातील भाविक बुलढाणा तालुयातील सैलानी येथे सैलानी बाबाच्या दर्शनासाठी निघाले होते. मेहकर ते चिखली मार्गावर नांद्रा धांडे फाट्याजवळ २९ मार्च सकाळी सहा वाजता चालकाला डुलकी लागल्याने एमएच-१३-सीटी-७८७० क्रमांकाचे महिंद्रा पिकअप हे वाहन उलटले. या अपघातात दोघांचा बळी गेला. अदनान शरीब बागवान व रिहान सय्यद बागवान हे दोघेजण जागीच ठार झाले. तर शहाना नबीसाहब बागवान (वय ३४), शबाना शरीफ बागवान (वय ३५), रफत शरीफ बागवान (वय १२), आफीफा आरिफ बागवान (वय ६), बुशरा आरिफ बागवान (वय १३), आलिया अनिस बागवान (वय २५), अफिस रौफ बागवान (वय २५), पाशा मोहंमद शाह बागवान (वय ७५), मैमिश नबीसाहब बागवान (वय १५), हिना अरिफ बागवान (वय ३०), अमीर बागवान (१३), अनस बागवान (वय १२), अबुजर बागवान (वय १०), साहेरा बागवान (वय ६५) हे जखमी झाले आहे. अपघातात ठार व जखमी झालेल्यांची नावे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने मेहकर पोलीस स्टेशनला दिली.
Powered By Sangraha 9.0