दोन बहीण भावांची पोलिस खात्यात निवड

29 Mar 2026 21:49:42
मारेगाव, 
Police recruitment selection वेगावच्या श्री जगन्नाथ महाराज विद्यालयात वर्ग पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले दोन माजी विद्यार्थी व सख्खे  बहीण भाऊ अमित राजेश दुर्गे व आंचल राजेश दुर्गे यांची नुकत्याच झालेल्या पोलिस भरती परीक्षेत अनुक‘मे नागपूर व वर्धा येथे निवड झाली. हे दोनही बहीण भाऊ मारेगाव तालुक्यातील केगाव या छोट्याशा आदिवासी बहुल गावात राहणारे आहेत. त्यांचे पालक साधारण शेतकरी आहेत. परंतु मुलांनी मेहनतीच्या जोरावर पोलिस खात्यात प्रवेश मिळवला आहे. ही बाब ग‘ामीण भागातील शेतकरी पाल्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे.
 
 
polickd
 
Police recruitment selection  त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल माजी विद्यार्थी म्हणून शनिवार, २८ मार्च रोजी श्री जगन्नाथ महाराज विद्यालयात मु‘याध्यापक नरेश वाघमारे व ज्येष्ठ शिक्षक माधव कोहळे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल पेचे, नरेंद्र खोके, पंकज राठोड, सतीश गौरकार, प्रशांत देरकर, कलावती कुडमेथे, सागर कडू उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0