चणा आणि तुरींमुळे बाजार समितीचे आवार ‘हाऊसफुल्ल’!

29 Mar 2026 19:57:31
खरेदी प्रक्रिया ठप्प, शेतकरी हतबल
 
सिंदी (रेल्वे), 
येथील बाजार समितीच्या आवारात आठवड्यापासून तांत्रिक अडचणीमुळे Purchase of agricultural products halted शेतमालांची खरेदी ठप्प झाली. मात्र, चणा आणि तूर बाजार समितीच्या आवारात येत असल्याने समितीचे आवार मात्र हाऊसफुल्ल झाले आहे. सोमवार ३० मार्चपासून बाजार समिती पूर्ण क्षमतेनी शेतमाल खरेदी करेल, असे सांगण्यात आले आहे.
 
 
bazar
 
Purchase of agricultural products halted ज्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यांना समितीने एसएमएसद्वारे संदेश दिले. परिणामी, शेतमालाची आवक झाली. पण, पणन महामंडळाच्या पोर्टलमध्ये बिघाड झाल्याने अचानक चणा आणि तुरीची खरेदी प्रक्रिया थांबवावी लागली, असे सचिव महेंद्र भांडारकर यांनी सांगितले. पोर्टल सुरळीत करून व जमा असलेला शेतमाल अन्यत्र हटवून सोमवारपासून शेतमाल खरेदीचे व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी माहिती बाजार समितीचे सभापती के. बा. खंगारे यांनी दिली. दरवर्षी, चणा किंवा तूर खरेदी करताना पणन महामंडळ त्यांचा ग्रेडर देतात. यावेळी ग्रेडरही उशिरा मिळाला आणि शेतमालाची आवक वाढल्यामुळे हा घोळ निर्माण झाला, असे एका संचालकाने स्पष्ट केले. बाजारात या दोन्ही शेतमालांना वाढीव दाम मिळाले, की शेतकरी गर्दी करणार नाही, अशी चर्चाही आहे.
Powered By Sangraha 9.0